*आज शिवसेना चामोर्शी तालुका आढावा बैठकीचे आयोजन*

आज दिनांक ७ फेब्रुवारी २०२५ रोज शुक्रवारला दुपारी ठिक १ वाजता शिवसेना चामोर्शी तालुका आढावा बैठक,नविन तहसिल कार्यालयाजवळ, मोठ्या हाॅलमध्ये,आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला मा.हेमंतजी जंबेवार साहेब शिवसेना सह संपर्क प्रमुख,मा.राकेशजी बेलसरे शिवसेना जिल्हा प्रमुख,मा.दिपकदादा भारसाकडे युवासेना जिल्हा प्रमुख उपस्थित राहणार आहे.चामोर्शी तालुक्यातील शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनीकांकडून पक्ष संघटनात्मक बांधणीतसेच प्रत्येक गावातील पक्षाची सध्याची स्थिती आणि त्यावर पक्ष संघटना वाढविण्यासाठी उपाययोजना याधर विचार मंथन केले जाईल.सदर बैठकीला तालुक्यातील शिवसेना पदाधिकारी/युवासेना पदाधिकारी/महिला पदाधिकारी तसेच शिवसैनिकांनी उपस्थित राहावे.असे आवाहन मा.पप्पीभाई पठाण शिवसेना तालुका प्रमुख यांनी केले आहे.