*आरमोरी शिवसेना तालुक्याचा, शिवसेना जिल्हा सह संपर्क प्रमुख आणि शिवसेना जिल्हा प्रमुखानी घेतला आढावा*
दिनांक ५ फेब्रुवारी २०२५ रोज बुधवारला,शासकीय विश्राम भवन येथे मा.हेमंतजी जंबेवार शिवसेना सह संपर्क प्रमुख,मा.राकेशजी बेलसरे शिवसेना जिल्हा प्रमुख,मा.दिपकदादा भारसाकडे युवासेना जिल्हा प्रमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत,आरमोरी विधानसभा शिवसेना आरमोरी तालुक्याची आढावा बैठक पार पडली.या बैठकीमध्ये मा.हेमंतजी जंबेवार साहेब शिवसेना जिल्हा सह संपर्क प्रमुख म्हणाले की,आगामी स्थानिक स्वराज्य संस्था,नगर पंचायत तसेच नगर परिषद निवडणुकीत विजय मिळविण्यासाठी,बुथनिहाय शाखा निर्माण करा.तसेच शहरामध्ये प्रभागरचनेनुसार शाखा प्रमुख,बुथ प्रमुख नियुक्त करा,आणि शहरामध्ये प्रभागरचनेनुसार शिवसेना शाखा निर्माण करण्याचे आवाहन त्यांनी शिवसैनिकांना केले.त्यानंतर मा.राकेशजी बेलसरे शिवसेना जिल्हा प्रमुख बैठकीत बोलतांना म्हणाले,आगामी निवडणुकीत शिवसेना पक्षाचे संघटन मजबूत ठेवून,”गाव तिथे शिवसेनेची शाखा, आणि घर तिथे शिवसैनिक” याप्रमाणे शिवसेनेचा विचार,हेतू,उद्देश आणि गोरगरिबांचा पक्ष म्हणूनच आमच्या मागील ना.शिदे सरकारने गोरगरिबांसाठी शिक्षण,आरोग्य,महिला सशक्तीकरण,मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना,लखपती दीदी,शेतकरी,कामगार,बेरोजगारांसाठी अनेक योजना अमलात आणल्या त्या जनतेपर्यंत पोहचवण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले.सदर बैठकीला मा.नारायणजी धकाते आरमोरी विधानसभा संघटक,मा.संतोषजी गोंदोळे आरमोरी विधानसभा प्रमुख,मा.राकेशजी बैस आरमोरी विधानसभा समन्वयक,मा.मधुसूदनजी चौधरी आरमोरी तालुका प्रमुख,मा.राजेद्रजी दिवटे आरमोरी उपतालुका प्रमुख,मा.संजयजी चट्टे आरमोरी विधानसभा उपप्रमुख,मा.शैलेंद्रजी कोहळे आरमोरी विधानसभा सहसंघटक,मा.सौ.अर्चनाताई संतोषजी गोंदोळे आरमोरी महिला विधानसभा जिल्हा प्रमुख,मा.सौरवजी कांबळे युवानेते,मा.अजयसिंग गहेरवार युवानेते,मा.सौ.वैशालीताई बिजागरे आरमोरी महिला शहर प्रमुख,मा.सौ.किरणताई बरडे शिवसेना महिला तालुका प्रमुख वडसा,सौ.रत्नाताई मेश्राम,सौ.आशाताई खोब्रागडे,सौ.सिंधुताई जंगम, मा.धनंजय गहेरवार आरमोरी सर्कल लो.अध्यक्ष,मा.अश्विनजी तितरमारे युवानेते आरमोरी तालुका,मा.अमनसिंग गहेरवार युवा नेते,मा.विवेकजी खापरे युवा नेते,आरमोरी तालुक्यातील शिवसेना पदाधिकारी आणि महिला पदाधिकारी तसेच आरमोरी विधानसभेतील शिवसेना पदाधिकारी /महिला शिवसेना पदाधिकारी युवासेना/युवतीसेना पदाधिकारी बहुसंख्येने उपस्थित होते.